MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !

MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी जाहिर ? जाणून घ्या इथे!

नमस्कार मंडळी तर, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोरआली आहे. राज्यसरकारच्या माध्यमातून एक नवा निर्णय घेण्यात आला असून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे. हा शासकीय निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत घेण्यात आलेला असुन जो तीन जून 2024 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.(MJPJAY GR )

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचे सलगणीकरण करून या दोन्ही योजना संपूर्ण राज्यभरात राबवण्याचा निर्णय हा 26 फेब्रुवारी 2019 पासून घेण्यात आलेला आहे.

तसेच या योजनांच्या अंमलबजावणीकरिता सन 2024-2025 या वित्तीय वर्षासाठी एकूण 650 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय करण्यात आलेला आहे.

निधी मंजूरी आणि वितरण (MJPJAY GR )

एप्रिल 2024 ते जून 2024 या कालावधीसाठी अदा करण्यात आलेल्या विमा हप्त्यासाठी फरकाची रक्कम ४९ कोटी ६७ लाख ५८ हजार रुपये इतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीसाठी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाने केला होता.

विमा हप्ता, आर्थिक वर्ष (MJPJAY GR)

राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी काम केले जाते.

या योजनेद्वारे लाभार्थी कुटुंबांकरिता दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या मासिक कालावधीतील विमा हप्ता २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खालील लेखा शीर्षकांतर्गत विमा हप्ता फरकाची रक्कम ४९ कोटी ६७ लाख ५८,००० रुपये सशस्त्र निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावे यासाठी नियंत्रक अधिकाऱ्याकडे सपूध करण्यात आले आहे.

धनादेश व वितरण प्रक्रिया (MJPJAY GR)

रकमेचा धनादेश हा राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नावे काढण्यात यावा असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे.

शासन निर्णयाची उपलब्धता

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्याअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यावयाचा आहे तसेच ज्याना कोणाला आरोग्यासाठी, त्यांच्या दवाखान्याचा खर्चासाठी जर पैसे लागत असतील अशा लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोहचणे गरजेचे आहे.

शासनाचा हा निर्णय तुम्हाला पाहिजे असल्यास, www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

हेही वाचा ●

LIC Loan: किती रुपयांचे कर्ज मिळवून देते LIC policy? जाणून घ्या इथे..

Banana farming : 12 वी नंतर, शेती करण्याचा निर्णय आणि आज नफा ऐकून व्हाल थक्क

PM Kisan Samman Nidhi Yojana : १७ वा हप्ता कधी मिळणार , त्याआधीच करा ही कामे !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment