Mukhyamantri ladki bahin yojana in pending To Submitted : अर्ज सबमिट झाला की नाही ? कसे पहावे?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ला राज्यभरातून भरगोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अवघ्या 25 दिवसांतच 1 कोटी 80 लाखांपेक्षा अधिक अर्ज सादर झाल्याचे सांगितले जातेय.
30 ते 40 वयोगटातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत, त्यात वैवाहिक, घटस्फोटीत, आणि अविवाहित महिलांची संख्या सुद्धा अधिक आहे.
(Mukhyamantri ladki bahin yojana in pending To Submitted)
बऱ्याच अर्जदार महिलांनी नारिशक्ती दूत या अॅप वरून अर्ज केला तर आहे, परंतु अनेक अर्जदारांना आपला अर्ज सबमिट झालाय की नाही याबाबत फारच चिंता आहे. अर्ज सबमिट केल्याच्या नंतर “In Pending To Submitted” असा पर्याय दिसत आहे. तुम्हाला सुद्धा हाच पर्याय दिसतोय का ? तर चिंता करण्याची गरज नाही . “In pending To Submitted” हा पर्याय असे सांगतो की, तुमचा अर्ज नामंजूर झालेला नाही, तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ट पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी सुरु आहे. अर्ज मंजूर किंवा ना मंजूर झाल्यास ते लवकरच कळवले जाईल.
अर्जाचे स्टेटस कसे पहावे?(Mukhyamantri ladki bahin yojana in pending To Submitted)
नारी शक्ती दूत अॅप वरून अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवरिल उजव्या बाजूस असलेल्या “i” या चिन्हा वर क्लिक करावे. तिथे तुम्हाला अर्जाचे स्टेटस तपासाता येईल.
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला “SMS Verification Done” हा पर्याय येत असल्यास तुमच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे, असे समजावे.
३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आलेले अर्ज स्वीकारण्यात येतील, त्यामुळे अद्दाप अर्ज न केलेल्या महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?
पैसे कधी जमा होणार ?
17 ऑगस्ट 2024 रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये, अर्ज केलेल्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
अशाच नवनवीन योजना अपडेट वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हॉट्सप ग्रुप ला जॉईन व्हा ! 👉 व्हाटसप ग्रुप..
हेही वाचा:
1 ऑगस्ट पासून बदलणार हे 5 नियम ! जाणून घ्या इथे..
Ration card Update : 1 ऑगस्ट पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम !