Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 : लाभासाठी बँक सिडींग स्टेटस असे चेक करा !

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 
असे चेक करा बँक सिडींग स्टेटस !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.(Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळत आहे, असे म्हणायला हरकत नाही, कारण 14 14 ऑगस्टपासूनच योजनेस पात्र ठरलेल्या अनेक महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण ३,००० रुपये प्राप्त झाले आहेत. अजूनही महिलांच्या खात्यावर पैसे येण्याची ही प्रक्रिया सुरूच असून येत्या १७ ऑगस्टपर्यंत सर्वच पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. परंतु ज्या महिलांचे आधार क्रमांक आणि बँक खाते हे एकमेकांशी लिंक नाहीये अशा महिलांना हा लाभ दिला जाणार नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, काळजी करण्याची गरज नाही ; कारण आजच्या लेखात आपण याच बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लेखात आपण आपल्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही? कोणते बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे? हे कसे पाहता येईल या बद्दल सविस्तर आढावा घेणार आहोत.

 

 

लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना देण्यात तुमच्याद्वारे देण्यात आलेले बँक खाते हे आधार नंबर सोबत लिंक/ संलग्न नसल्यास या या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळेच जरी तुम्ही पात्र असाल , तरी देखील तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला सुध्दा आपले बँक खाते आधार सोबत लिंक केल्याचे आठवत नसेल तर, तुमच्या बँकचे सिडिंग स्टेटस तपासा व अर्जात दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांका सोबत लिंक करून घ्या.(Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 )

 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024

असे तपासा बँक सिडिंग स्टेटस ;

सर्वप्रथम बँक सिडिंग स्टेटस तपासण्याकरिता युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या http://uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाईट वर आल्यानंतर आपल्याला हवी असलेली भाषा निवडावी.

आता भाषा निवडल्यानंतर ‘आधार सर्व्हिसेस’ नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे आणि पुढे तुम्हाला ‘आधार लिकिंग स्टेटस’ हा ऑप्शन दिसेल.

या ऑप्शन वर म्हणजेच आधार लिकिंग स्टेटसवर क्लिक केल्यावर एक नवी विंडो उघडले. त्यात ‘बँक सिडिंग स्टेटस’ या ऑप्शनवर क्लिक करावे.

आता तुमचा आधार नंबर आणि तिथे दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉगीन करुन घ्या. त्याकरिता आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी टाकून यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर लॉगीन होईल.

आता तुमच्या समोर खाली प्रमाणे ‘बँक सिडिंग स्टेटस’ हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लीक केल्यावर तुमच्या तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते बँक खाते लिंक आहे , हे इथे समजेल.(Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 )

हेही वाचा: लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता राज्यसरकारची लाडकी गृहसेविका योजना !

5 वर्षांत 12 लाख रुपयांचे व्याज देणारी ही योजना तुम्हाला माहित आहे का ?

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment