Mukhyamantri Yojana Doot 2024 : राज्यात शासनाकडून एका पाठोपाठ इज योजना राबवल्या जात आहेत. आणि या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, त्यांना लाभ मिळावा याकरिता योजनांसाठी काम करणाऱ्या मुख्यमंत्री योजना दूत अशा पदांसाठी मोठी भरती सुरु केली आहे. राज्यभरातून एकूण पन्नास हजार रिक्त जागांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची एक प्रकारे सुवर्णं संधीच ठरु शकते. या भरती मध्ये सहभागी होण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतिने अर्ज करावा लागणार आहे. तर हा अर्ज कुठे आणि कसा करायचा तर जाणून घेऊयात या भरती बद्दल सविस्तर आढावा.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक चांगली सुविधा आहे. कारण या मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत (इंटरव्हिव) द्यावा लागणार नाहीये. या भरतीची निवड प्रक्रिया थेट असणार आहे. शिवाय नोकरीसाठी तुम्हाला दुसरीकडे कुठेच जाण्याची गरज नाही, तुमच्या शहरात किंवा गावात राहूनच नोकरी करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनीतर नक्कीच अर्ज करायला हवा.(Mukhyamantri Yojana Doot 2024 )
काम काय करावे लागणार ?
Mukhyamantri Yojana Doot 2024
अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्या मधील सर्व योजनांची माहिती पुरवली जाणार. त्यानंतर प्रशिक्षित योजनादुता द्वारे त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी भेट देऊन सांगितलेली कामे पार पाडणे बंधनकारक असणार आहे. त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे.
मानधन / वेतन किती दिले जाणार ?
निवड होऊन नोकरीवर रुजू झाल्यास राज्य सरकार द्वारे उमेदवारांना महिन्याला १०,००० रुपये वेतन दिले जाणार.
आवश्यक पात्रता काय असणार ?
सदर भरतीस अर्ज करण्याकरिता अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक . अर्जदाराकडे कुठल्याही क्षेत्रातील पदवी असणे गरजेचे आहे.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराकडे स्मार्टफोन असावा.
अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे आधार संलग्न असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
नोकरी कायमस्वरूपी असणार का ?
तर मंडळी ही नोकरी सहा महिन्याच्या करारावर असणार आहे. तसेंच या करारात वाढ केली जाणार नाही. शिवाय सरकारी सोयी सुविधांचा लाभदेखिल दिला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.(Mukhyamantri Yojana Doot 2024 )
भरती बद्दल अर्ज करण्यासाठी येथे संपर्क साधावा; जिल्ह्या ठिकाणी असणारे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार केंद्र किंवा रोजगार उद्द्योजकता व नावीन्यता विभागाच्या अधिकृत संकेटस्थळाला भेट द्यावी.
येथे :- https://rojgar.mahaswayam