Namo Shetkari Yojana 5th Installment Date : नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता कधी जमा होणार ?

Namo Shetkari Yojana 5th Installment Date : नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. मंडळी पीएम किसान सन्मान निधी म्हणजेच नमो शेतकरी योजने संदर्भातील आणखी एक नवी अपडेट समोर आली आहे. जसे की आपल्याला ठाऊक असेलच, शिंदे सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपयांचा निधि देण्यात येतो.

योजनेचे एकूण तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर चौथा हप्ता जमा होण्यास बराच विलंब लागला, यादरम्यान योजना बंद झाली की काय ? अशा बऱ्याच प्रश्नांना उदान येत होते. अशातच नमो शेतकरी योजने अंतर्गत 90 लाख 80 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चौथा हफ्ता म्हणजेच दोन हजार रुपये हप्ता 21 ऑगस्ट 2024 रोजी जमा करण्यात आला आहे.

दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सवातून हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असलेले मान्यवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेंच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा हप्ता थेट पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांद्वारे समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव चौथ्या हप्त्याची वाट पाहत होते, आणि अखेर लाडकी बहीण योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा बार देखील शिंदे सरकारने उडवून दिला आहे.(Namo Shetkari Yojana 5th Installment Date)

राज्यातील एकूण 90,88,556 शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याद्वारे 1,888 कोटी 30 लाख 26 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

पाचवा हप्ता कधी मिळणार ?

Namo Shetkari Yojana 5th Installment Date

चौथ्या हप्त्या नंतर पुन्हा प्रतीक्षा आहे ती म्हणजे पाचवा हप्ता जमा होण्याची . याआधी चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र जमा होणार अशा बऱ्याच अफ़वा पसरत होत्या , शिवाय वित्त विभाग यावर कार्यशील असल्याचेही सांगितले जात होते. परंतु 21 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचा फक्त चौथाच हप्ता वितरित करण्यात आला आहे.

त्यामुळेच आता योजनेचा पाचवा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न पुन्हा निर्माण होतो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पाचवा हप्ता हा येत्या सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पाचवा हप्ता सप्टेंबर महिन्यात जमा होणार का , याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.(Namo Shetkari Yojana 5th Installment Date)

नमो शेतकरी योजनेचा स्टेटस तपासा आपल्या मोबाईलवरून ! 

(How to check namo kisan status)

नमो शेतकरी योजनेत तुम्ही आधीच नोंदणीकृत शेतकरी असाल तर, वेळेवर लाभ मिळवण्यासाठी तुमची स्थिती अशी तपासता येईल.

नमो शेतकरी योजनेचा निधी चेक करण्याबाबत देखील बऱ्याच शेतकरी बांधवांना अनेक समस्या येत असतात. तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आपल्या मोबाईलवरूनच नमो शेतकरी योजनेचा स्टेटस कसा तपासायचा या बद्दल देखील स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत.(Namo Shetkari Yojana 5th Installment Date)

स्टेटस चेक करण्याकरिता करिता सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या, http://nsmny.mahiti.org या अधिकृत संकेतस्थळावर यायचे आहे.

  • वेबसाइटवर आल्या नंतर तुमच्या मोबाईल स्क्रीन वर एक निळ्या चौकोनात आणि लाल चौकोनात Login आणि  Beneficiary स्टेटस असे दोन पर्याय दिसतील.
  • त्या पर्यांया पैकी‌ तुम्हाला Beneficiary status  या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • Beneficiary Status येथे क्लिक केल्या नंतर एक नवीन पेज उघडेल तिथे खाली स्क्रोल करायचे आहे. 
  • आता तुम्हाला Registration नंबर किंवा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.

    Namo Shetkari Yojana 5th Installment Date
    Namo Shetkari Yojana 5th Installment Date
  • त्यांनतर पुढे दिलेला Captcha कोड जशास तसा कॉपी करून टाकायचा आहे. आणि Get Data या पर्यायवर क्लिक करायचे आहे.
  • Get data वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. तिथे Home विभागात तुमची संपूर्ण माहिती दिसेल. ज्या मध्ये तुमचा Registration नंबर देखील दिलेला असेल, जो तुम्हाला माहीत नसल्यास, नोट करून घ्यावा.Namo Shetkari Yojana 5th Installment Date
  • Namo Shetkari Yojana 5th Installment Date

त्यानंतर आणखी खाली स्क्रोल केल्यानंतर Found Disbursed Details असा निळ्या चौकोनात पर्याय दिसेल, त्या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या निधीचे संपूर्ण स्टेटस दिसेल. जसे की Payment Success झाले आहे का, आत्ता पर्यंत किती हप्ते मिळाले, किती हप्ते पेंडींग आहेत, बँकेचे नाव, हप्ता मिळाल्याची तारीख अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला तिथे दर्शवली जाईल. 

Namo Shetkari Yojana 5th Installment Date
Namo Shetkari Yojana 5th Installment Date

ज्या शेतकऱ्यांना मागील काही हप्ते प्राप्त झाले नसल्यास, पाचव्या हप्त्या दरम्यान ते मिळू शकतात. तसेंच ज्या शेतकऱ्यांना आत्ता पर्यंत एकही हप्ता मिळाला नाहीये, अशा शेतकरी बांधवांनी आपल्या जवळील तहशील कार्यालयाला भेट द्यावी.

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..

हेही वाचा;  आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !

कापूस व सोयाबीन अनुदानाचा निधी आला की नाही ? असे तपासा

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment