NPS Vatsalya Scheme 2024 :एनपीएस वात्सल्य योजना नेमकी काय आहे ? कसा करावा अर्ज? वाचा इथे..
तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपले प्रभात मराठीवर सहर्ष स्वागत ! नेहमी प्रमाणे आज सुद्धा आपण एका नवीन शासकीय योजने बद्दल खास अपडेट म्हणजेच योजने बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजच्या लेखात आपण काही दिवसांपासून सुरू झालेली योजना म्हणजेच ‘एनपीएस वातसल्य योजना.’ बऱ्याच लोकांना ही योजना माहीत नसेल , त्यामुळे हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा.चला तर मग वाचूयात योजने बद्दल सविस्तर माहिती.(NPS Vatsalya Scheme 2024)
एनपीएस योजना म्हणजे नक्की काय ?
(What is NPS Vatsalya Scheme ?)
देशाच्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या द्वारे 2024 रोजी झालेल्या अर्थसंकल्पावेळी या योजनेची म्हणजेच एनपीएस वात्सल्य या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली होती.
तसेंच 18 सप्टेंबर 2024 पासून ही योजना संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आलेली आहे.
एनपीएस वात्सल्य योजना ही एकप्रकारे राष्ट्रीय पेन्शन योजना आहे . यात गुंतवणूकदार म्हणजेच पालकांना 18 वर्षांखालील मुलगा आणि मुलीसाठी त्यांच्या नावावर गुंतणूक करता येते. मूल 18 वर्षांचे झाल्यानंतर वात्सल्य एनपीएस खाते नियमित होऊ शकते. तसेंच गुंतवणुकीचे हे कर बचतीचे फायदे गुंतवणूकदारांना मिळत राहतात.
देशातील पालक आणि मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आई-वडील आपल्या मुलांच्या नावचे खाते उघडून त्यामध्ये नियमित पैशांची गुंतवणूक करता येणार आहे . यासोबतच “एनपीएस वात्सल्य योजना” फ्लेक्सिबल काँट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे.(NPS Vatsalya Scheme 2024)
NPS वात्सल्य योजनेसाठी पात्रता :
NPS Vatsalya Scheme 2024
अर्जदार पाल्याचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक आपल्या अल्पवयीन मुलांचे NPS वात्सल्य योजनेचे खाते उघडू शकतात आणि ते व्यवस्थापित करू शकतात.
एनपीएस वात्सल्य योजना अल्पवयीन म्हणजे 18 वर्षांखालील मुलांकरिता असणार आहे.
सदर (NPS Vatsalya Scheme 2024) योजना भारतीय नागरिकांसाठी असणार आहे, त्यामुळे केवळ भारताचे रहिवाशीच योजनेसाठी अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे :
- पालकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इ.
- अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा
- अधिवासप्रमाणपत्र
- अल्पवयीन मुलाचे ओळखपत्र
- मोबाइल नंबर
- ईमेल आयडी
- फोटो
वात्सल्य योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असा करता येणार :
(How To Apply NPS Vatsalya Scheme)
योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला eNPS पोर्टलवर किंवा enps.nsdl.com, nps.kfintech.com या वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला नवीन खाते उघडण्यासाठी “Registration” पर्यायावर क्लीक करावे लागेल.
त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, मोबाइल अशी विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
आता तुमची अर्ज नोंदणी केल्याच्यानंतर तुम्हाला कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक म्हणजेच PRAN नंबर देण्याय येईल.
तर आता तुम्हाला कमीत-कमी 1000/- रुपयांमध्ये हे खाते सुरू करता येईल.
या योजने अंतर्गत जर पालकांनी मुलांच्या नावे दर वर्षाला 10,000 रुपये भरले, तर दिलेल्या कालावधीच्या अखेरीस 10% अपेक्षित परताव्याच्या दराने (ROR) गुंतवणूक अंदाजे 5 लाख रुपये इतकी होईल. तसेंच सदर गुंतवणूकदार हा वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करत असल्यास, वेगवेगळ्या परताव्याच्या दरांवर अवलंबून अपेक्षित रक्कम लक्षणीयरीत्या बदलू शकते.
ज्या पालकांना त्यांच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांनी या योजनेचा नक्की विचार करायला हवा.
तर मंडळी अशाच नवनवीन योजनां बद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा ! येथे क्लीक करा .
हेही वाचा: –
ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचा सविस्तर माहिती इथे..