Onion Farming : कांदा लागवड करायची आहे ? मग ही माहिती नक्की वाचा !

Onion Farming : कांदा लागवड करायची आहे ? मग ही माहिती नक्की वाचा !
Onion Farming
Onion Farming

मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या शेतजमिनीत ‘कांदा’ पीक घेण्याचा विचार करत आहात ? (Onion Farming) आणि त्याकरिता एकरी लागणारी रोपे, जमीन कशी असावी? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल? तर हा लेख एकदा नक्की वाचा.

जसे की आपल्याला कल्पना असलेच की, भारतामधील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू , आंध्र प्रदेश, बिहार अशा राज्यांमध्ये कांद्याची लागवड मोठ्याप्रमाणात केली जाते. कांदा पीक म्हत्त्वपूर्ण पिकांपैकी एक मानले जाते. तर तुम्ही सुद्धा कांदा पिकाची लागवड कशी करायचा विचार करीत आहात ? चला तर मग जाणून घेऊयात या बद्दल सविस्तर माहिती.

भाजीपाला तसेंच मसाला म्हणून कांदा पिकाला बरेच महत्त्व आहे. कांद्या मध्ये देखील काही प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिने तसेंच औषधी गुणधर्म सुद्धा आढळतात. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहार इ. राज्यांमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कांदा लागवडीसाठी पुढील काही बाबी लक्षात घेऊन लागवड केली तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकतो.

कांदा लागवडीकरिता योग्य व्यवस्थापन

कांदा लागवडीसाठी सर्वच प्रकारचे चोख व्यवस्थापन फायदेशीर ठरतर. परंतु तसे पाहायला गेले तर, कांदा लागवडीकरिता साधारणपणे सर्व प्रकारची माती योग्य प्रकारे काम करू शकते. पण उत्तम निचरा, ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आणि सेंद्रिय पदार्थांनी युक्त अशी चिकणमाती कांदा लागवडीसाठी योग्य मानली जाते.

कांदा लागवड करण्यासाठी मातीचे PH मूल्य 6 ते 7 असणे महत्ताचे असते.

तुम्हाला १ एकरच्या क्षेत्रामध्ये कांद्याचे उत्पादन घ्यायचे असेल तर, त्याकरिता 4 ते 5 किलो बियाणे पूरक ठरतात.

कांदा लागवडी नंतर एक ते दोन महिन्यांनी हवामान थंड होते. आणि फुलांच्या दरम्यान तापमानात झालेली ही वाढ पिकासाठी अनुकूल मानली जाते.(Onion Farming)

काळी माती पीकांसाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली मानली जाते. काळी माती सेंद्रिय खतांनी समृद्ध असते. या जमिनीत हेक्टरी ४० ते ५० टन देशी खत टाकल्यास उत्पादनात वाढ होताना पाहायला मिळते. त्यामुळे काळ्या मातीत कांद्याची लागवड केलेली अधिक फायदा देते.

सध्या कांद्याचा घाऊक भाव ७,०००/- रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोहोचला आहे. निर्यात खुली आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामात कांदा लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.(Onion Farming)

असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.  येथे क्लिक करा 

हेही वाचा : दुध व्यवसाय आणि शेतीसाठी वाहन खरेदी करताय ? तर हे नक्की वाचा ;

Best Agriculture Apps : या 3 ॲप च्या मदतीने शेती होणार सुलभ !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment