Pik vima 2023 status check online : पीक विमा मंजूर झाला की नाही , असे तपासा स्टेटस ऑनलाईन !
नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. तर जसे की आपल्याला ठाऊक असेलच प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण शेतीसंदर्भातील लेख, शासकीय योजना आणि नोकरी संदर्भातील अपडेट देत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण 2023 मधील खरीप आणि रब्बी हंगामातिल विमा मंजुरीचे स्टेटस ऑनलाईन कसे चेक करायचे या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील 2023-24 च्या खरीप तसेंच रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याची रक्कमेचा अजूनही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाहीये.त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे. 21 लाख 45 हजार 665 शेतकरी बांधवांची पिक विमा रक्कम थकीत असून, 2 हजार 306 कोटी इतकी रक्कम कंपन्याकडून येणे बाकी आहे. ही रक्कम सरकार कडून कंपन्यांना दिली तरच ती वितरित केली जाऊ शकते.
2023 पीक विमा रक्कम कधी येणार ?
Pik vima 2023 status check online
राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांना पीक विमा कधी येणार? असे प्रश्न पडत आहेत. परंतु ही रक्कम कधी येणार याबद्दलची कसलीही माहिती अद्याप तरी समोर आली नाहीये. याबद्दलची काही अपडेट आल्यास प्रभात मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवु.
पीक विमा मंजुर आहे की नाही ते स्टेटस कसे तपासायचे ?
Pik vima 2023 status check online
पीक विम्याची वाट पाहताय तर , मंजुरीचे स्टेटस आपल्या मोबाईल वरून कसे तपासायचे याबद्दलची संपुर्ण पद्धत आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
स्टेटस चेक करण्याकरिता सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील गूगल वर जाऊन , PMFBY.In असे सर्च करून वेबसाईट ओपन करा.
आता वेबसाईट ओपन झाल्यावर तिथे दिसणाऱ्या फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा. आता लॉगिन फॉर फार्मर (Login For Farmer) या ऑप्शन वर क्लीक करा.
आता तुम्ही पीक विमा भरताना रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी ( Request for Otp) या पर्यायावर क्लिक करा.
आता पुन्हा तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि पुन्हा एकदा कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी ( Request for Otp) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो या ठिकाणी टाकून लॉगिन (Login) वर क्लीक करायचे आहे.
लॉगिन केल्यानंतर तुमची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. जसे की वरील रकान्या मध्ये, शेतकर्याचे नाव , आधार नंबर, मोबाईल नंबर इत्यादी.
त्याच्या खाली तुमची पोलिसिची माहिती दिसेल. त्यानंतर वर्ष आणि हंगाम याची माहिती दिसेल. तुम्हाला ज्या वर्षीचा किंवा हंगामाचा स्टेट्स पाहायचा असेल ते वर्ष तुम्ही निवडू शकता.(Pik vima 2023 status check online)
आपण उदाहरणार्थ 2023 चा खरीप हंगाम निवडूया, 2023 पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुमचे जेवढे काही विमे असतील ते त्याठिकाणी तुम्हाला दर्शवले जातील. यामध्ये तुमच्या विम्याचे पॉलिसी नंबर, इन्शोरन्स कंपनी, बँकेची शाखा, इन्शोरन्स किती आहे यासाठी पर्याय, किती जमिनीची पॉलिसी, प्रीमियम किती भरला होता. अशी सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल.
यामध्ये तुम्हाला पॉलिसी स्टेट्स ॲप्रोव्हड दिसत असेल , तर त्याचा विमा काढलेला आहे, असे समजावे.
त्यानंतर क्लेम डिटेल्स वर क्लीक केल्यानंतर , क्लेम कधी केला होता, कधी तो सेटल झाला, त्याचा प्रकार , रक्कम मंजूर झाली की नाही, रक्कम मिळाली असेल तर क्लेम स्टेट्स मध्ये पेमेंट Success असे दाखवेल. पिक विमा मंजूर झाला असेल तर त्याची तारीख देखील दिसेल. आणि मंजूर झाला नसल्यास या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार नाही.
तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या 2023 च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा मंजुरीचे स्टेटस चेक करता येणार आहे. (Pik vima 2023 status check online)
याच वेबसाईटच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पिक विमा भरण्यापासून पूर्वसूचना ते नुकसान भरपाई पर्यंतची सर्व काही माहिती दिली जाणार आहे.
आम्ही आशा करतो की हा लेख नक्कीच तुमच्या साठी फायदेशीर ठरेल, तर अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण लेख नियमित तुमच्या पर्यंत पोहचावेत याकरिता प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा. आणि हा लेख आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा.
हेही वाचा:-Namo Shetkari Yojana 5th Installment Date : नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता कधी जमा होणार ?
Battery Favarni Pump Yojana Status Check : फवारणी पंप योजनेच्या अर्जाचा स्टेटस असा तपासता येणार..