Pik Vima Update : 24 हजार शेतकरी पीक विमा परताव्या पासून वंचित !

Pik Vima Update  :  नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण पीक विमा योजने बाबत आणखी एक खास अपडेट घेऊन आलो आहोत. तर मंडळी गत वर्षीय खरीप हंगामात झालेल्या नुकसानग्रस्त 24 हजार 799 शेतकरी बांधवांना अजूनही पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. आणि विशेष बाब म्हणजे, या शेतकऱ्यांना 1 हजार रुपयांहुन कमी परतावा देण्याचे मंजूर झाले आहे.
Pik Vima Update
Pik Vima Update

तर, 29 हजार 356 शेतकरी बांधवांचा परतावा बँकेच्या तांत्रिक अडचणी सांगून होल्डवर ठेवण्यात आलेला आहे.

खरीप हंगामात जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाचा मोठा खंड, यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले.

त्यामुळेच उंबरठा उत्पादनाच्या आधारावर यांना परतावे देण्याचे ठरले होते. आणि त्याकरिता पीककापणी प्रयोगाचा देखील आधार घेतला गेला. कंपनीने तशी, परतावे देण्यासाठी नकारघंटा वाजविली होती. परंतु कृषी विभागाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तंबीनंतर परतावे देण्यात आले.

विमा कंपनीकडे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 563 परतावा मिळावा याकरिता तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र कंपनीने त्यापैकी केवळ 1 लाख 8 हजार 150 शेतकऱ्यांनाच 49.77 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे असे म्हंटले. तसेंच एकूण पूर्व सुचनेपैकी तब्बल 61 हजार 413 सूचना कंपनीने परताव्याासाठी अपात्र ठरविल्याचे सांगितले आहे. त्यांच्या 43.36 कोटी रुपये देण्याकडे कंपनीने पाठ फिरवली आहे.(Pik Vima Update )

विमा काढलेल्या 24 हजार 799 शेतकऱ्यांना विम कंपनीने 1,000 रुपयांपेक्षाही कमी परतावा मंजूर केलाय.

या शेतकऱ्यांचे अद्दाप 85 लाख 62 हजार रुपये कंपनीकडून मिळणे बाकी आहे.(Pik Vima Update )

आता नवीन हंगाम सुरू झाला तरी देखील परताव्याबद्दल कंपनीकडून काहीच अपडेट आलेली नाहीये. त्यामुळेच ते मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होतो आहे.(Pik Vima Update )

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा...<

<<<chat.whatsapp>>>>>>

हेही वाचा: Aamcha Ladka Shetkari Yojana ; आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !

Pik Vima Yojana : 2023 मधील खरीप पीक विमा रक्कम अजूनही शेतकऱ्यांना नाही !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment