Pik Vima Yojana : 2023 मधील खरीप पीक विमा रक्कम अजूनही शेतकऱ्यांना नाही !

Pik Vima Yojana : 2023 मधील खरीप पीक विमा रक्कम अजूनही शेतकऱ्यांना नाही !
Pik Vima Yojna : 2023 वर्षांत खरीपा मध्ये लागवड झालेल्या पिकांचा विमा अद्द्यापही शेतकऱ्यांना प्राप्त न झाल्याची बातमी समोर येत आहे.

कृषी विभागा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विविध विभागांकरिता लागू करण्यात आलेल्या विमा कंपन्यांकडे अजूनही 2 हजार 800 कोटी रूपये प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.(Pik Vima Yojana)

दरम्यान, सरकारने एक रूपयांत पीक विमा लागू केल्यानंतर राज्याभरातुन चांगला प्रतिसाद मिळाला असून 1 कोटी 70 लाख शेतकरी बांधवांनी या विम्यासाठी अर्ज केला होता. परंतु या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाच्या अनियमिततेमुळे तसेंच पावसातील 21 दिवसांपेक्षा जास्त पडलेल्या खंडामुळे आणि मातीत असणाऱ्या ओलाव्याच्या कमतरते मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुढे पिकांचे अनेक पंचनामे होऊन सुद्धा विमा कंपनीने शेतकरी बांधवांना विम्याची रक्कम पुरवली नाहीये.

मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार राज्यातील 7 हजार 322 कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाई करिता निश्चित करण्यात आली होती. आणि त्यातील 4 हजार 524 कोटी रक्कम वितरीत झाली आहे . तसेंच 2 हजार 798 कोटी 43 लाख रूपयांची रक्कम अजूनही प्रलंबित आहे.

3 हजार 309 कोटी निश्चित नुकसान भरपाई असलेल्या रूपयांपैकी , कंपनीने केवळ 802 कोटी वितरित केलेत. आणि 2 हजार 507 कोटी रूपये प्रलंबित आहेत.(Pik Vima Yojana)

यामागोमागच भारतीय कृषी विमा कंपनी कडून निश्चित करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या 924 कोटी रूपयांपैकी फक्त 704 रूपये वितरीत केले आहेत ,तर 219 कोटी रूपये हे कंपनीकडे प्रलंबित आहेत.

आता एक वर्ष उलटून गेले तरी देखील मागच्या हंगामातील विमा रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी निराश आहेत.

आता विमा कंपन्या एवढ्याच नफ्यात आल्या असतील तर मग सरकारची 1 रूपयांत पीक विमा असलेली योजना शेतकऱ्यांना फायद्याची ठरेलं की, विमा कंपन्यांना फायद्याची ठरेल ? असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.

हेही वाचा: Gai mhashi Vatap Yojana 2024 : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार करणार दुधाळ गाई म्हशींचे वाटप; वाचा काय आहे प्रकल्प !

Agriculture Bussines Ideas : शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment