Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply : महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी !

Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply ll पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी मिळणार १००% अनुदान !
(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply )
Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply

राज्यातील महिलांकरिता शासनाद्वारे अनेक योजना आखल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेला तर भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय आणखी बऱ्याच योजना शासन राबवत आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ महिला वर्गाचे सक्षमीकरण आणि आर्थिक पाठबळ मिळावे याउद्देशाने शासनाकडून मोफत पिठाची गिरणी योजना 2024, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना, मोफत शिलाई मशीन योजना,   पिंक रिक्षा योजना अशा आणखी बऱ्याच योजना राबवल्या जात आहेत. तर आजच्या लेखात आपण मोफत पिठाच्या गिरणी योजने बद्दल माहिती घेणार आहोत.

(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply )

तर मंडळी सध्या महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांत ही योजना सुरु झाली आहे. जसे की आपल्याला ठाऊक आहेच की पिठाची गिरणी ही परिवारातील अतिशय गरजेची वस्तू आहे.  प्रत्येक कुटुंबातील महिलांना नेहमी वाटत असते ,की आपल्या घरात स्वतःची दळण दळण्यासाठी चक्की असावी . जेणेकरून आपल्याला हवे ते दळण हवे त्या वेळी दळता येईल. तेही आपल्या पाहिजे त्या प्रमाणात. त्यामुळेच आता शासनाकडून राज्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत अगदी मोफत पिठाची गिरणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply )

ग्रामीण भागातील बऱ्याच महिला सुशिक्षित असून देखील त्यांना  ग्रामीण भागात रोजगारापासुन वंचित राहावे लागते. त्यामुळे अशा   ग्रामीण भागातील महिलांना घरातूनच एखादा उद्योग सुरु करता यावा आणि थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा खर्च निघू शकेल. या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply )

सदर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्याकरिता १००% अनुदान म्हणजेच अगदी मोफत पिठाची गिरणी घेता येणार आहे. 

योजनेचे वैशिष्ट्य:

योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नाही. 

सदर योजना ही ग्रामीण भागातील महीलांची प्रगती डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी योजनेचा लाभ घ्यायला हवा.

(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply )

मोफत पिठाची गिरणी योजनेचे उद्दिष्ट :

आर्थिक पाठबळ मिळवून देणे.

ग्रामीण भागातील महिलांचे उत्त्पन्न वाढावे.

महिलांना ग्रामीण भागात घरगुती उद्योग सुरु करता यावा.

योजने अंतर्गत किती अनुदान दिले जाते ?

मोफत पिठाची गिरणी योजने अंतर्गत लाभार्थी महिलेला पीठ गिरणीच्या एकूण किंमतीच्या 100 % अनुदान दिले जाते.

मोफत पिठाची गिरणी लाभासाठी काही नियम व अटी पुढीलप्रमाणे  :

(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply)

योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. 

अर्जदार महिला या ग्रामीण भागात राहणाऱ्या असाव्यात. 

अर्जदार महिला ही शहरी भागातील असल्यास योजनेसाठी अपात्र ठरली जाईल.

अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीवर नसावा.

एकाच कुटुंबातील अनेक मुली/महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्यातील एकाच मुली/महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल

अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारांपेक्षा कमी असावे.

अर्जदार महिलेने यायाआधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे राबवलेल्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ मिळवलेला नसावा.

अर्जदार महिलेचे वय १८ वर्ष ते ६० वर्ष यादरम्यान असावे.

योजनेचा अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे:

योजनेचा अर्ज / फॉर्म ( खाली लिंक देण्यात येईल)

अर्जदार महिलेचे आधार कार्ड

अर्जदार महिलेचे नाव नमूद असणारे रेशन कार्ड

रहिवाशी दाखला

जातिचा दाखला (अनुसूचित जाती/जमाती आवश्यक)

कुटुंबाचा वार्षिक उत्पनाचा दाखला.

ई-मेल आयडी

मोबाईल नंबर 

पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रतिज्ञा पत्र

बँक खात्याचा तपशील 

(अर्जदार यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार याचे बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स (यावर अर्जदाराचे नाव,बँकेचे नाव,शाखा,खाते क्रमांक व IFSC कोड इत्यादी माहिती स्पष्ट नमूद असावी.)

( त्यासोबतच बँक खाते सुरु असल्याबाबत मागील तीन महिने खात्यात व्यवहार झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी.)

व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना नंबर 8 अ चा घराचा उतारा जोडला जावा.

विद्युत पुरवठा सोय असण्याबाबत एम.एस.ई.बी. च्या नजीकच्या बिलाची झेरॉक्स प्रत.

(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply )

अर्ज रद्द होऊ शकतो, कारण :-

अर्जदाराने एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द करण्यात येईल.

अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी नसल्यास.

अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणीचा लाभ मिळवला असल्यास. 

(Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply )

पिठाची गिरणी योजना 2024 ऑनलाईन अर्ज करता येणार ? 

Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply

तर मंडळी पिठाची गिरणी योजन 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अद्द्याप तरी शासनाद्वारे कोणतीही वेबसाइट किंवा पोर्टल सुरु केली नाहीये. ऑनलाईन अर्जाची नवीन अपडेट आल्यास तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल. त्यामुळे सध्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. हा ऑफलाईन अर्ज कसा करावा यासाठी खालील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत:

या लेखात आपण मोफत पीठाच्या गिरणी साठी ऑफलाईन अर्ज कसा करता येईल हे पाहणार आहोत. ऑफलाईन अर्ज करण्याकरिता सर्वात पहिली प्रक्रिया म्हणजे अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अथवा जिल्ह्यातील महिला , बालकल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज म्हणजेच योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. आणि त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज जमा करावा लागेल. आणि अशा प्रकारे तुमचा अर्ज सादर केला जाईल.

Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply
Pithachi Girni Yojana Maharashtra Online Apply

 

अर्ज पीडीएफ नमुना इथे पहा : – 👉येथे  क्लिक करा   

तर मंडळी या लेखात आम्ही मोफत पीठाची गिरणी योजने बद्दल पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा लेख आपल्या गावातील गरजू महिलां पर्यंत नक्को पोहचवा.

आणि अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..

FAQ :-  

1) मोफत पीठाची गिरणी योजना कोणत्या प्रवर्गातील लोकांसाठी आहे ?

उत्तर :- अनुसूचित जाती / जमाती (महिला)

2) मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कसा करावा? 

उत्तर-  तुम्ही राहत असलेल्या भागातील ग्रामपंचायत कार्यालय अथवा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत या योजनेसाठी अर्ज करता येईल.

हेही वाचा: –

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार , वाचण्यासाठी ( इथे क्लिक करा )

 नवीन योजना :- ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचण्यासाठी (इथे क्लीक करा)

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता येण्या आधी करा हे काम ! 

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment