Pm Awas yojana 2025 Maharashtra : प्रधानमंत्री आवास योजने बद्दल संपूर्ण माहिती वाचा इथे..

Pm Awas yojana 2025 Maharashtra : काय आहे प्रधानमंत्री घरकुल योजना 2025?
१ एप्रिल २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना( ग्रामीण) ची सुरू करण्यात आली होती. तसेंच ही योजना म्हणजे भारत सरकारचा ग्रामीण विकास मंत्रालय (MoRD) मार्फत राबवला जाणारा एक प्रकारे प्रमुख उपक्रम आहे. हा उपक्रम गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) द्वारे लागू केला जातो आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे बेघर असलेल्या कुटुंबांना आणि कच्च्या तसेंच मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्यांसाठी पक्के घर प्रदान करून देणे हा आहे.(Pm Awas yojana 2025 Maharashtra )
सदर योजनेच्या माध्यमातून २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत, एकूण २.७२ कोटी उद्दिष्टांपैकी २ कोटी घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. योजनेची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात पाठवण्यात येते.
Pm Awas yojana 2025 Maharashtra : प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण) २.० योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना सुरक्षित आणि आरोग्यदायी घर प्रदान करून देणे हा आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास , pmayg.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

घरकुल योजना 2025 अर्ज करण्याची पात्रता
- घरकुल योजना 2025 ऑनलाइन अर्ज / प्रधानमंत्री आवास योजना –
- ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जकाने खालील पात्रता निकष पूर्ण असावेत.
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे पक्के घर नसावे..
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावी.
- वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपये दरम्यान असावे.
- अर्जकर्त्याचे नाव राशन कार्ड किंवा बीपीएल यादीत असावे.
- मतदार यादीत नाव असणे त्यांच्यासाठी एक वैध ओळखपत्र (आधार, पॅन, पासपोर्ट, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) असावे.
(Pm Awas yojana 2025 Maharashtra )
- पगारदार लोकांसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखीचे प्रमाणपत्र: पॅन कार्ड/आधार कार्ड/मतदार
- आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- राष्ट्रीयत्व ओळखण्यासाठी: मतदार कार्ड किंवा आधार कार्ड (मूळ आणि छायाप्रत)
- श्रेणी पुरावा: SC/ST/OBC/अल्पसंख्याक प्रमाणपत्र
- घराच्या पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र: पगार स्लिप किंवा नियुक्ती पत्र किंवा वेतन प्रमाणपत्र
- LIG/EWS उत्पन्न प्रमाणपत्र
- फॉर्म 16/इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर/इन्कम टॅक्स रिटर्न या वर्षी भरले
- मालमत्ता मूल्यांकन प्रमाणपत्र
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- घर बांधणीचे पूर्ण नियोजन
- गृहनिर्माण संस्था किंवा कोणत्याही संबंधित
- प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र
- एकूण बांधकाम खर्चाचे प्रमाणपत्र
- घर बांधण्यासाठी करार केला
- घराच्या बांधकामासाठी आगाऊ पैसे भरल्याच्या सर्व पावत्या
- वाटप पत्र/करार किंवा मालमत्तेचे इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज
- अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही
- सदस्याचे देशात कुठेही कायमस्वरूपी निवासस्थान नसल्याचे प्रतिज्ञापत्र.
(Pm Awas yojana 2025 Maharashtra )
- जे स्वयंरोजगार आहेत किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा: पॅन कार्ड/आधार कार्ड/मतदार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र: मतदार कार्ड किंवा आधार कार्ड
वर्ग ओळखीचे प्रमाणपत्र: SC/ST/OBC/ - अल्पसंख्याक प्रमाणपत्र
- घराचा पत्ता प्रमाणपत्र: आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- इन्कम सर्टिफिकेट: फॉर्म 16/इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर/आयकर रिटर्न, चालू आर्थिक वर्षात भरलेला.
- स्वयंरोजगार किंवा व्यवसायाचे स्वरूप आणि क्रियाकलाप प्रमाणित करणारा आर्थिक अहवाल
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- पूर्ण घर बांधण्याची योजना
- गृहनिर्माण संस्था किंवा संबंधित प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र.
- एकूण बांधकाम खर्चाचे प्रमाणपत्र
- घराच्या बांधकामासाठी विकासक आणि बिल्डर यांच्यात झालेल्या कराराची तपशीलवार प्रत.
- घराच्या बांधकामासाठी केलेल्या कोणत्याही आगाऊ देयकाच्या सर्व पावत्या
- मालमत्तेचे वाटप पत्र किंवा करार किंवा इतर संबंधित कागदपत्रे
- अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे देशात कुठेही कायमस्वरूपी घर नसल्याची कबुली देणारे शपथपत्र
(Pm Awas yojana 2025 Maharashtra )
घरकुल योजना 2025 साठी अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज.
घरकुल योजना 2025 ऑनलाइन अर्ज / प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यासाठी खाली दिलेले सोपे स्टेप्स फॉलो करा:
सर्वप्रथम, प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणच्या अधिकृत वेबसाइटवर जा. (लिंक पुढीलप्रमाणे आहे.)
https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx लिंक वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन होम पेज उघडेल.
आता तुम्हाला पेज मधील Awaassoft च्या मेन्यूमध्ये Data Entry ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.क्लिक करताच आणखी एक नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर DATA ENTRY For AWAAS वर क्लिक करावे.
आता तुमचे राज्य व जिल्हा निवडा आणि “Continue” या बटनावर क्लिक करा.
आता आपल्या समोर एक नवीन पेज उघडेल. जिथे तुम्हाला यूझरनेम, पासवर्ड, आणि कॅप्चा टाकून “Login” बटनावर क्लिक करावे लागेल.
Personal Details (व्यक्तिगत माहिती) Beneficiary Registration Form मध्ये भरा.
त्यानंतर, Beneficiary Bank Account डिटेल्स म्हणजेच तुमचे बँक खाते तपशील भरा.
आता तिसऱ्या विभागात, Beneficiary Convergence Details म्हणजेच जॉब कार्ड नंबर आणि SBM नंबर भरा.
चौथ्या विभागात, Details Filled By Concern Office (ब्लॉकद्वारे भरलेली माहिती) असेल.
अशाप्रकारे, तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. सत्यापनानंतर, लाभार्थ्यांना स्वीकृती पत्र दिले जाते. ज्यामध्ये योजनेअंतर्गत मिळणारे लाभ दर्शवले जातात. हे पत्र SMS च्या माध्यमातून सुद्धा पाठवण्यात येते.
हेही वाचा:- अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा
Vishal kamble , Founder : Prabhatmarathi.com : passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi.