Pm Kisan 18th Installment : शेतकरी बांधवांना उद्या होणार डबल धनलाभ !

Pm Kisan 18th Installment 
Pm Kisan 18th Installment
Pm Kisan 18th Installment

नमस्कार शेतकरी बांधवांनो, पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासुन या योजनेच्या निधीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

 तर ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या महिन्यातील १८ वा हप्ता आणि ५ वा हप्ता उद्या म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता पोहरादेवी, ता. मानोरा, जिल्हा वाशिम याठिकाणी होणाऱ्या एका समारंभादरम्यान वितरीत केला जाणार आहे.

देशातील शेतकरी बांधवांना निश्चित उत्पन्न देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाद्वारे मा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी. एम. किसान योजना फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकरी कुटुंबास रुपये २००० प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात दर वर्षी रूपये ६००० हे  पात्र ठरलेल्यांच्या आधार संलग्न सक्रीय बँक खात्यात हा निधी  जमा केला जातो. पी. एम. किसान योजने अंतर्गत आत्तापर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबर २०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण १७ हप्त्यांमध्ये सुमारे रू. ३२,००० कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे.(Pm Kisan 18th Installment)

यासोबत जसे की आपल्याला ठाऊक असेलच पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. 

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून पुढील हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येतो आहे.

२०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने एकूण ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. ६,९४९.६८ कोटी लाभ दिलेला आहेनमो केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याचा निधी वाटपापूर्वी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या तसेंच बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या आणि ईकेवायसी करून घेतलेल्या एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. १,९०० कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तसेंच राज्याच्या योजनेमधून पूर्वीच्या प्रलंबित हप्त्यासह रू. २,००० कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत.(Pm Kisan 18th Installment)

दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या समारंभामध्ये पीएम किसान योजनेच्या अंतर्गत रूपये २,००० तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रूपये २,००० असा एकुण  ४,००० रुपयेचा लाभ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील  ९१.५२ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहे.(Pm Kisan 18th Installment)

पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या लिंकचा वापर करावा असे आवाहन मा. श्री. धनंजय मुंडे, मंत्री कृषी यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना  केले आहे.

लिंक :- pmindiawebcast.nic.in

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा :- येथे क्लिक करा    

शासनाच्या इतर योजना 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?

रब्बी हंगाम 2024 बियाणांसाठी मिळणार अनुदान , असा करा अर्ज !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment