Pm Kisan Samman Nidhi 19th Installment Date : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार ?
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला आहे. हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच Direct Benefit Transfer – DBT प्रणालीद्वारे दिला आहे. त्यानंतर आता पुढील हप्ता म्हणजेच १९ वा हप्ता शेतकऱ्यांना पडला असेल, तर आजच्या या लेखात आपण याच बद्दल माहिती घेणार आहोत.
काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना ?
पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी योजना असून, देशासह राज्यातील शेतकऱ्यांना योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळवुन देणे हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये देऊ केली जाते. दर चार महिन्यांनी 2,000 रुपये असा एक हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो.
कधी येऊ शकतो १९ वा हप्ता ?
Pm Kisan Samman Nidhi 19th Installment Date :
जसे की आपल्याला ठाऊक असेलच की, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे वर्षभरात तीन वेळा, चार महिन्यांच्या अंतराने देण्यात येतात. याचप्रमाणे आता १९ वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२५ मध्ये जमा होणार असल्याची शक्यता आहे. तसेंच याबाबतची अधिकृत घोषणा देखील पीएम किसानच्या वेबसाइटवर करण्यात येईल.
१९ वा हप्ता येण्यापूर्वी करा हे काम !
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी eKYC करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा हप्ता जमा होण्याबाबत बऱ्याच अडचणी तुम्हाला येऊ शकतात.
लाभार्थी स्टेटस कसा तपासायचा ?
(Pm Kisan Samman Nidhi 19th Installment Date)
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आपला लाभार्थी स्टेट्स हा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासता येतो.
वेबसाईटवर आल्यानंतर “Beneficiary Status” पेजवर क्लिक करुन ,आधार क्रमांक किंवा खाता क्रमांक प्रविष्ट करुन,“Get Data” वर क्लिक करावे. अशा प्रकारे तुम्हाला
आपल्या पेमेंटची स्थिती तपासता येईल.
व्हाट्सअप ग्रुप :-whatsapp.com
Surya Ghar Yojana Maharashtra : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, पीएम सूर्य घर योजना , असा करा अर्ज !