Post office Scheme : पोस्ट ऑफिसची ही नवीन योजना वर्षभरातच महिलांना देते 2,32,000 रुपयांचा फायदा !
देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भारत सरकार द्वारे विविध योजना राबवल्या जात असतात. अशाच एका नवीन योजनेबद्दल आजच्या लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण ज्या योजनेची माहिती घेणार आहोत , ही योजना महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ‘ महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना’ असे या योजनेचे नाव असून, महिला वर्गाला आर्थिक बचत करण्यासाठी व चांगला फायदा मिळवुन देणारी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या योजनेबद्दलच्या मह्त्वपुर्ण गोष्टी.
काय आहे या योजनेचा मुख्य उद्देश ?
देशातील महिला वर्गाला वित्तीय सुरक्षा यासोबतच आत्मनिर्भर बनविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेंच या योजनेमुळे महिलांना योग्य बचत करुन चांगला फायदा मिळवुन देण्याची संधी देते.
Post office Scheme
गुंतवणुकीची मर्यादा किती ?
गुंतवणुकी बद्दल बोलायचे झाल्यास तर, या योजनेमध्ये महिलांना कमीत कमी 1,000 रुपयांपासून , जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करता येत आहे .पुढे गुंतवणूक केल्यापासून 90 दिवसानंतर, आणखीन एक खाते काढता येऊ शकते, आणि पैसे हे शंभर रुपयांच्या गुणकांमध्ये जमा केले जातात. जसे की 1,100 रुपये ,1,200 रुपये याप्रकारे जमा करता येऊ शकतात.
व्याजदर किती ? Post office Scheme
या योजनेमधिल खास गोष्ट म्हणजे व्याजदर ! सध्या सरकार कडून 7.5% इतके वार्षिक व्याजदर दिले जात आहे. आणि हा दर अन्य बचत योजनांपेक्षा अधिक आहे. मात्र तुम्हाला कमीत कमी दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतील उदाहरणार्थ :- जर तुम्ही 1 जून 2024 ला पैसे जमा करत असाल तर तुम्हाला एक जून 2026 ला पूर्ण रक्कम देण्यात येईल.
पैसे काढण्याची सुविधा :-
पैसे जमा केल्याच्या 1 वर्षानंतर जमा झालेल्या रकमेच्या 40% भाग/ रक्कम तुम्हाला काढता येईल. फारच गरज पडल्यावर ही सुविधा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल . आणि उर्वरित रक्कम 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर काढता येईल.(Post office Scheme)
योजनेचे खाते कसे काढावे ?
तर मंडळी , या योजनेसाठी खाते उघडण्याकरिता तुम्हाला आपल्या जवळीलच डाकघराला भेट द्यावी लागणार आहे. तिथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती म्हणजेच नाव, मोबाईल नंबर ,पत्ता , पॅन कार्ड नंबर आणि ओळखपत्राची झेरॉक्स इत्यादी गोष्टी आवश्यक असणार आहेत. पोस्ट ऑफिस च्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला अर्ज करण्यास मदत केली जाईल.
योजनेच्या खास गोष्टी जाणून घ्या.
मंडळी, या योजनेमध्ये तुम्हाला 7.5% वार्षिक व्याज मिळते, जी की इतर बँकांच्या साधारण बचत योजनांपेक्षा अधिक आहे. तसेंच अगदीच गरज पडल्यास एक वर्षानंतर आपल्या रकमेचा 40% भाग देखील काढता येऊ शकतो. शिवाय
सदर योजना ही सरकारकडून चालवली जात असल्याने आपले पैसे सुद्धा सुरक्षित राहणार आहेत. त्याबद्दलची चिंता राहणार नाही.
परंतु विशेष म्हणजे (Post office Scheme महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट ) ही योजना फक्त महिलांसाठीच असणार आहे. त्यामुळे पुरुष मंडळींना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. सदर योजना म्हणजेच ‘ महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना’ ही महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यासाठी चांगली संधी देत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेत सहभागी व्हायला हवे. ही योजना महिलांना फक्त चांगले व्याजच नाही तर चांगली बचत करण्याची देखील सवय करते. त्यामुळे आजच या योजनेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका .
तर मंडळी, माहिती आवडल्यास आणखी पुढे पाठवा , आणि अशेच नवनविन अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा !
हेही वाचा: