Prathamesh shivalkar : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने बांधले नवे घर

Prathamesh shivalkar ; महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठी वर प्रसारित होणारा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय झाला आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरातून देखील या कार्यक्रमाला बराच प्रतिसाद मिळत आहे. शिवाय यातील बऱ्याच कलाकारांना हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. गौरव मोरे ,वनिता खरात, ओमकार भोजने, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, रोहित माने अशा बऱ्याच नवोदित हास्यविरांना या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली आहे. अशाच कलाकारांमधील आणखी एक नाव म्हणजे प्रथमेश शिवलकर . अभिनय आणि कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत प्रथमेश ने सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रथमेश हा एक उत्तम लेखक सुद्धा आहे. प्रथमेशने काही दिवसांपुर्वीच महिंद्रा थार गाडी घेतली होती. आता प्रथमेशने त्याचं घर घेण्याचं स्वप्न देखील पूर्ण केलं आहे.

Prathamesh shivalkar
Prathamesh shivalkar

 पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुले यांची खास पोस्ट !

प्रथमेशने नुकताच आपल्या शेतात आलिशान बंगला बांधला आहे. ‘शिवार्पण’ असे त्याने आपल्या नव्या घराला नाव दिले आहे. प्रथमेशने आपल्या नव्या घराचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या सोबतच एक खास पोस्ट‌ सुद्धा लिहिली आहे. त्याने असे लिहिले की “यांजसाठी केला होता अट्टाहास भाग २:शिवार्पण. शहरापासून दूर हक्काची एक वास्तु असावी. जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी,मातीच्या सुगंधाने दरवळत रहावा तिथला प्रत्येक क्षण, अशीच स्वप्नातली वास्तु झाली साकार…नाव तिचे “शिवार्पण”. ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो , त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते,तेव्हा त्या वास्तुचे ऋण फ़ेडन्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच ”शिवार्पण”. हक्काचं शेतघर”, असं लिहित त्याने ही खास पोस्ट शेअर केली आहे. आणि सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसते आहे. (Prathamesh shivalkar)

Gaurav more: वडीलांच्या आठवणीत गौरव झाला भाऊक

Nikhil Bane: कोकण , पहिला पाऊस आणि&

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment