Ratan Tata Car Collection : या होत्या रतन टाटा यांच्या आवडत्या गाड्या !

Ratan Tata Car Collection : या होत्या रतन टाटा यांच्या आवडत्या गाड्या !
Ratan Tata Car Collection
Ratan Tata Car Collection

भारतातील जेष्ठ उद्योगपती सर रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या कार्याचा आवाका बराच मोठा आहे. तसेंच ते अतिशय साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जायचे. रतन टाटांच्या बऱ्याच आवडी निवडी देखील होत्या.

रतन टाटा यांना गाड्यांचे देखील प्रचंड वेड होते, आणि क्वचितच ते महागड्या गाड्यांमध्ये फीरतांना दिसायचे. यांपैकी एक त्यांची आवडती कार म्हणजे टाटा नॅनो.

रतन टाटा यांच्या बऱ्याच आवडी निवडी होत्या परंतु त्यांना कारचे अधिक आकर्षण होते. त्यामुळे त्यांच्याकडे कार कलेक्शन देखील चांगलेच होते. तर आजच्या लेखात आपण रतन टाटा यांच्या काही खास असलेल्या आणि आवडत्या गाड्यांबद्दल माहिती घेऊयात.

Ferrari California: फेरारी कॅलिफोर्निया

रतन टाटा यांच्या आवडत्या गाड्यांपैकीच एक असलेली कार म्हणजे ‘फेरारी कॅलिफोर्निया.’ बऱ्याचदा रतन टाटा ह्या कारमध्ये फिरताना दिसले आहेत.

या कार बद्दल बोलायचे झाले तर, 4.3-लिटर V8 इंजिनद्वारे ही कर समर्थित आहे. जे की 490 PS आणि 504 Nm पीक टॉर्क जनरेट करते. सध्या कंपनीने हे मॉडेल बंद केले आहे. मात्र फेरारीने लाँच केलेल्या सर्वात लोकप्रिय कारपैकी हे एक उत्तम मॉडल होते.(Ratan Tata Car Collection)

Tata Nano ( टाटा नॅनो ) :

दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये २००८ साली नॅनो कार अवघ्या १ रुपयात लाँच करून इतिहास रचला होता. या प्रकल्पाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता मात्र, रतन टाटा यांनी ते प्रत्यक्षात आणलेच.

टाटा नॅनो रतन टाटा यांच्या हृदयाच्या अगदी जवळील कार होती. प्रत्येक मध्यमवर्गाला या कारने त्यांची पहिली कार घेण्याचे स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण सुद्धा करून दाखवले होते.(Ratan Tata Car Collection)

कार बद्दल बोलायचे झाले तर, नॅनो कारमध्ये ४ जणांना बसायला अधिक स्पेस देण्यात आली आहे. परंतु क्युटच्या बॉक्सी डिझाईनमुळे त्यामध्ये ५ लोक सहज बसू शकतात. नॅनो कारचे मायलेज 21.9 ते 23.9. किमी/ली आहे. मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 23.9. किमी/लिटर आहे. ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 21.9 किमी/लिटर आहे. मॅन्युअल CNG व्हेरिएंटचे मायलेज 36 किमी इतके आहे.(Ratan Tata Car Collection)

Tata Nexon : (टाटा‌ नेक्सॉन )

ही देखील रतन टाटा यांची आवडती कार होती. यामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, 10.25-इंच फुल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग तसेंच उंची ॲडजस्टेबल फ्रंट सीट, क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स यांसारखी विविध वैशिष्ट्ये आहेत. शिवाय सबवूफरसह 9-स्पीकर JBL साउंड सिस्टीम आणि हरमन एन्हांस्ड ऑडिओवर्क्स असे फिचर्स देखील आहेत.

हेही वाचा: 

TATA off-road SUV : 2025  मध्ये टाटा लाँच करणार महिंद्रा थारला टक्कर देणारी ऑफ-रोड एसयूव्ही !

Auto Hold In Car : जाणून घ्या कार मधील Auto Hold Function म्हणजे काय ? आणि कसे काम करते

जॉईन व्हा : whatsapp channel

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment