Ration Card e Kyc Online : 31 ऑक्टोबर शेवटची तारीख , लवकर करा हे काम !

Ration Card e Kyc Online : 31 ऑक्टोबर पूर्वी करा हे काम , अन्यथा तुमचे रेशन होईल बंद !

Ration Card e Kyc Online
Ration Card e Kyc Online

जसे की आपल्याला ठाऊक असेलच की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत राज्यातील अनेक गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा करण्यात येतो. परंतु आता सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या म्हणजेच शिधापत्रिकाधारकांना आपल्या रेशन कार्डची ई- केवायसी करुन घ्यावी अशी अट शासनाकडून घालण्यात आली आहे. आता ही ई-केवायसी कशाकरिता ? तर याचे उत्तर असे की योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांचा शोध हा ‘ई- केवायसी’तून घेता येणार आहे.(Ration Card e Kyc )

तर तुम्ही देखील इ-केवायसी अजूनही केली नसल्यास , लवकरात लवकर करून घ्या. कारण ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रक्रिया म्हणजेच ई केवायसी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

सरकारने घातलेल्या अटीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील रेशन मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे आवश्यक आहे. , ‘ई-केवायसी’ करण्याकरिता ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ही प्रक्रिया करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नियोजन करून शिधापत्रिका धारकांनी ई केवायसी करून घ्यावी. जर शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य दिले जाणार नाही.इतकेच नाही तर, अशा  शिधापत्रिकाधारकांची नावे देखील रेशनकार्डमधून वगळली जातील. आणि अशा शिधापत्रिका सरळ रद्द केल्या जाणार आहेत.(Ration Card e Kyc Online)

अन्न नागरी पुरवठा केंद्रा कडून करण्यात आले आवाहन 

(Ration Card e Kyc Online)

आपल्या रेशन कार्ड मधील जे सदस्य हयात नाहीत. परंतु त्यांचे नाव शिधापत्रिके मधून अद्द्याप वगळले नाही. अशा सदस्यांचे नाव तात्काळ कमी करण्यासाठी आपल्या जवळील रेशन दुकानाशि संपर्क साधावा. तसेंच आपल्या कुटुंबातिल जेवढ्या काही सदस्यांचे नाव शिधापत्रिके मध्ये आहे , अशा सर्व सदस्यांनी आपले आधार कार्ड घेऊन जवळील रेशन दुकानात जाऊन व्हेरेिफिकेशन करुन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे आवाहन अन्न नागरी पुरवठा केंद्र ग्राहक संरक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

ई – केवायासी कशी आणि कुठे करावी ?

Ration Card e Kyc Online

तर रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील ज्या ज्या सदस्यांची नावे आहेत अशा प्रत्येकाला आपल्या क्षेत्रातील म्हणजेच आपल्या जवळील रेशन दिले जाणाऱ्या दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्राद्वारे तुम्हाला केवायसी करता येईल. त्यासाठी तुम्हाला त्या मशीनमध्ये आपला आधार क्रमांक सिडींग करून घ्यायचा आहे. तसे पाहायला गेलं तर अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असणार आहे. तुम्हाला रेशन दुकानात आपले आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागणार आहे. आधार कार्ड नंबर , बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन करून तुमची ही प्रक्रिया केली जाणार आहे.(Ration Card e Kyc Online)

ई-केवायसी झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाईल , अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे ई – केवायसी करायला चुकवू नका.

एका ठिकाणाऊन दुसऱ्या ठिकाणी जसे की गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातीलं स्वस्त धान्य- दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येईल.

याशिवाय तुम्ही आपल्या रेशन कार्डची ई- केवायसी याआधी कधी केली आहे का, हे देखील तुम्ही तपासू शकता आपल्या मोबाईलवर. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर , पुन्हा करायची गरज भासणार नाही.

ई – केवायसी झाली की नाही असे तपासा ;

Ration Card e Kyc Online

सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील प्ले-स्टोअरमध्ये जाऊन ‘मेरा राशन’ हे अँप डाऊनलोड करुन घ्यावे.

अँप चालू करून तुमचा रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दर्शवले जातील.

तुम्ही आधार किंवा शिधापत्रिका यांपैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट बटणावर क्लिक करुन घ्यावे.

त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे.
त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा
पर्याय दिसेल.

तुमच्या कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा पर्याय दिसेल, अशा सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज लागणार नाहीये. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो (No) असा पर्याय दिसेल अशा सदस्याला ई-केवायसी केल्या शिवाय पर्याय नाही.

ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला देखील भेट देऊ शकता. परंतु तुम्हाला सध्यातरी रेशन दुकानात जाऊन केवायसी करून घेणे सोयीचे पडेल.

ई – केवायसी का आणि कशासाठी ? त्याचा फायदा काय ?

Ration Card e Kyc Online

ई- केवायसी ही नवीन प्रक्रिया आणण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की, धान्य वितरणामध्ये पारदर्शकता यावी. यासोबतच बऱ्याच ठिकाणी ही बाब मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे ती म्हणजे, काही दुकानदार प्रत्येक व्यक्ती पन्नास रुपये घेतो. ई-केवायसीच्या माध्यमातून आता बनावट लाभार्थीचा शोध घेता येणार आहे. तसेंच रेशनकार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असताना देखील बरेचजण स्वस्तातील धान्य घेतात. इतकेच नाही तर, अनेक लोक सध्या या जगात नाहीत, त्यांचा मृत्यू झाला, तरीही त्यांची नावे शिधापत्रिकांमध्येच आहेत. आणि दुसरीकडे बनावट रेशनकार्ड बनवून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेतच. अशा सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची ज्यांची नावे नोंदलेली आहेत, त्या सदस्यांना ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक असणार आहे. आपण वर सांगितल्याप्रमाणेंच जवळील अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

ई-केवायसी करण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल ?

Ration Card e Kyc Online

असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर आहे ‘नाही’. याचा अर्थ तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरले जाणार नाही. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया निःशुल्क ठेवण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी केली जाणार आहे. केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया सहजरित्या आणि अवघ्या काही मिनिटांत पूर्ण केली जाते. ई-केवायसी करण्यास रेशन दुकानदाराने पैसे मागितल्यास तक्रार करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाट कसली बघताय ? लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची ई केवायसी करून घ्या. आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारांपर्यंत नक्की पोहचवा.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा :- whatsapp.com

हेही वाचा :- Ladki Bahin Yojana : महिलांना पुन्हा मिळणार 3,000 रुपये !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment