Ration card Update online : आता रेशन कार्ड अपडेट करता येणार , घरबसल्या..

Ration card Update online : आता रेशन कार्ड अपडेट करता येणार , घरबसल्या..

रेशन कार्ड हे भारतातील नागरिकांचे महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. नागिरिकांना धान्य आणि इतर आवश्यक वस्तूंची सबसिडी रेशन कार्ड द्वारे दिली जाते. मंडळी तुमचे रेशन कार्ड अद्यतन / अपडेट करायचे आहे का ? तर मग हा लेख तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Ration card Update online

मंडळी तुम्हाला आपले रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी ‘महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल . जी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.(Ration card Update online)

http://mahafood.gov.in

जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर वेबसाइटवर नोंदणी करुन घ्या. आणि जर तुम्ही आधीच नोंदणीकृत असाल तर तुमच्या लॉगिन तपशीलांसह लॉगिन करावे.

लॉगिन केल्यानंतर ‘रेशन कार्ड’ विभाग निवडावा.

त्यानंतर रेशन कार्ड अपडेट फॉर्म हा पर्याय निवडा. त्याठिकाणी आवश्यक माहिती जसे की आधार कार्ड क्रमांक, नवीन पत्ता, सदस्यांची माहिती भरा.

संपूर्ण माहिती भरल्यावर आवश्यक दस्तऐवज जसे की नवीन पत्ता पुरावा, सदस्यांची ओळखपत्रे इत्यादी अपलोड करा.

रेशन कार्ड मध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क आकारण्यात येईल .जी की ऑनलाइन भरावी लागेल.

सबमिशन केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक एसएमएस पाठवला जाईल.

आता तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करता येईल.

वरील पद्धतीचा उपयोग करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकता.

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :(Ration card Update Online)

आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
विज बिल
पासपोर्ट आकाराचे फोटो
ड्रायविंग लायसन्स
भाडे करारनामा (Rent Agreement)
पत्ता पुरावा
पाणी बिल
बँक पासबुक
सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड
कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
अर्जदाराचा आणि सर्व कुटुंब सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
जन्म प्रमाणपत्र
कुटुंबातील लहान मुलांसाठी जन्म प्रमाणपत्र.

नवीन रेशन कार्ड अर्ज फॉर्म योग्यरित्या भरून सर्व कागदपत्रे एकत्र करून जवळच्या रेशनिंग कार्यालयात (FPS) सादर करावेत.

ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास
महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाइटला भेट द्या: mahafood.gov.in
नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
‘रेशन कार्ड’ विभाग निवडून, नवीन रेशन कार्ड अर्ज फॉर्म भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आणि मग फीस भरुन सबमिट करा.

Ration card Update : 1 ऑगस्ट पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम !

Pipeline anudan yojana maharashtra : पाईपलाईनसाठी मिळणार 15 हजार रुपये अनुदान ! अर्ज करण्यासाठी फक्त 24 रुपये खर्च!

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment