Sanjay gandhi niradhar yojana shravan bal yojana new Update : संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्त योजनेत मोठा बदल , वाचा इथे..

Sanjay gandhi niradhar yojana shravan bal yojana new Update : संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेबद्दल नवीन अपडेट !
Sanjay gandhi niradhar yojana shravan bal yojana new Update
Sanjay gandhi niradhar yojana shravan bal yojana new Update

 

‘संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना’ या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. तर आता नुकताच या योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण आता डिबिटी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासनाकडून जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर नेमके काय सांगितले आहे या शासन निर्णया मध्ये याच बद्दल आपण आजच्या लेखात सविस्तर आढावा घेणार आहोत.

(Sanjay gandhi niradhar yojana shravan bal yojana new Update )

शासन निर्णय ( GR ) नेमका काय सांगतो ?

१९ डिसेंबर २०२४ रोजी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी श्रावण बाळ योजना व निराधार योजना या योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण डिबिटी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासनाकडून जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. डीबीटी मार्फत म्हणजे कसं तर आपल्याला माहीत असेलच की, पीएम किसानचे पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे अशा बऱ्याच योजना आहेत ज्यांचे पैसे डीबीटी मार्फत येतात. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना देखील आता महाडीबीटी द्वारे निधी जमा करण्याचे काम करणार आहे.

आधार कार्डला तुमचे जे बँक खाते लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचे या योजनेचे पैसे येणार आहेत, अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जीआर मधील काही ठळक मुद्दे :

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना असेल तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना असेल आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यामी निवृत्ती योजना असेल तसेच राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना या सर्व योजना राबविण्यात येत असतात. नवीन जीआर नुसार माहे डिसेंबर 2024 पासून म्हणजे याच महिन्यापासून आता योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी मंडळी आहेत, त्यांना जे अर्थसहाय्याचे वितरण होणार आहे, ते डीबीटी मार्फत करण्यात येणार आहे. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायची बाब शासनाच्या विचारात आधीच होती आणि त्या अंतर्गतच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत जे काही डीबीटी पोर्टल वरती नोंदणी झालेली आहे अशा लाभार्थ्याची संख्या 27 लाख 15 हजार 796 आहे. या लाभार्थ्यांना आता जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यात येणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आता डीबीटी पोर्टल द्वारे जे काही लाभार्थी असणार आहेत त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल तो हफ्ता डीबीटी पोर्टल द्वारे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आता यामध्ये बऱ्याच जणांचं जर डीबीटी खाते तयार झालं नसेल तर त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने पारंपारिक पद्धतीने हा निधी देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे. तसेंच जानेवारी 2025 पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांना जेवढे लाभार्थी असतील त्या सर्वांना जानेवारी 2025 पर्यंत सगळे हप्ते इथून पुढे डीबीटीमार्फतच होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे.(Sanjay gandhi niradhar yojana shravan bal yojana new Update )

दिनांक 19/12/24 रोजी जो काही ऑन बोर्ड झालेला आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याची संख्या 12,37425 इतकी आहे. आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थी संख्या 14 लाख 79 हजार 366 इतकी आहे. असे एकूण 27 लाख 15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे जे काही अर्थसहाय्य आहे, ते डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याकरिता ४०८ कोटीची उपाय निधीची आवश्यकता असणार आहे आणि त्याला सुद्धा इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळेच या योजनेअंतर्गतचे पैसे आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मंडळी तुमचे जर डीबीटी खाते नसेल तर लवकरात लवकर डीबीटी तयार करून घ्या आणि जर ते नसेल तर डायरेक्ट तुम्ही पोस्टमध्ये सुद्धा जाऊन अकाउंट उघडू शकता आणि तुमचं जे काही पैसे आहेत ते तुमचे पोस्टमध्ये सुद्धा ॲटोमॅटिकली जमा करून घेऊ शकता. पोस्टाचं खातं डीबीटीला एका दिवसात लिंक होतात.

तर मंडळी अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सॲप ग्रुपचे सदस्य व्हा.

येथे क्लिक करा  :  whatsapp.com

हेही वाचा: –  अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील निधी मिळणार या दिवशी !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment