Shetkari Karj Mafi News : प्रलंबित कर्जमाफीला सरकारकडून नकार ?
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री मोफत वीजबिल योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा अनेक योजना आखल्या नंतर सरकार कडे आता 2017 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी पैसेच नाहीत. म्हणूनच आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील 6 लाख शेतकऱ्यांच्या 5 हजार 975 कोटी रुपयांच्या मंजूर कर्जमाफीकडे सरकारने पाठ फिरवली आहे.
योजनेत पात्र परंतु वंचित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? असा प्रश्न मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचारल्यावर, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.(Shetkari Karj Mafi News)
महाराष्ट्रात कर्जमाफी होणार का?
‘महाऑनलाइन’च्या तत्कालीन तज्ज्ञांना बोलावून प्रलंबित कर्जमाफीचा सर्व डाटा पुनर्स्थापित करण्यात यश आलेले आहे. आणि ही माहिती पुनर्स्थापित झाल्यानंतर कर्जमाफी होईल अशी आशा होती. त्यासाठी सहकार विभागाने अर्थविभागाकडे प्रस्तावही पाठविला होता ,परंतु अर्थसंकल्पात भरमसाठ योजनांची घोषणा केल्यामुळे या योजनेकरिता पैसेच नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आधी कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकरी बांधवांचा भ्रमनिरास झालेला आहे.(Shetkari Karj Mafi News)
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत २६ लाख १७ हजार कर्जखात्यांची १५ हजार ३४९ कोटी रुपयांची कर्जमाफी निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी २४ लाख ८८ हजार कर्जखात्यांची १३ हजार ७०५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तर १ लाख २९ हजार कर्जखात्यांची १६४४ कोटी रुपयांची कर्जमाफी अद्याप शिल्लक आहे.
परतफेड योजनेंतर्गत सर्वाधिक रक्कम
या योजनेंतर्गत एकवेळ समझोता योजना राबविण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांचे दीड लाखांवर कर्ज होते, त्यांनी दीड लाखांवरील कर्ज भरल्यानंतर कर्जमाफी देण्यात येत होती. या योजनेंतर्गत ७ लाख २१ हजार कर्जखाती निश्चित केली होती. याअंतर्गत ६६१५ कोटी रुपये रक्कम निश्चित केली होती. त्यापैकी ४ कोटी २७ लाख कर्जखात्यांचे २६३० कोटी रुपये वितरित करण्यात आले. या योजनेतील २ लाख ९४ हजार कर्जखात्यांचे ३९८५ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत.
‘प्रोत्साहन’ची २ लाख ३३ हजार कर्जखाती शिल्लक
ज्या शेतकऱ्यांनी सलग दोन वर्षे पीककर्ज परतफेड केले, अशा १ कोटी ७२ लाख कर्जखात्यांपैकी २ लाख ३३ हजार कर्जखाती अजून प्रलंबित आहेत. या योजनेत २७७२ कोटी रुपयांची रक्कम वितरित केली आहे. तर अद्याप ३४६ कोटी रुपये प्रलंबित आहेत.(Shetkari Karj Mafi News)
Favarni Pump Yojana : फवारणी पंप अनुदान योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
कापुस सोयाबीन उत्पादक : शेतकऱ्यांना मिळणार , प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान !