Silver Rate Today 20 October 2024 : आजचा सोन्याचा दर ? दिवाळीत होणार घसरणं ?
दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. तर मागील तीन दिवसात सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती.दिवाळीपर्यंत सोने आणि चांदीचे दर मोठी मजल मारतील असा अंदाज तज्ज्ञां कडून वर्तवला जात आहे.
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारपेठा देखील सजायला सुरुवात झाली आहे. अशातच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरु झाले आहेत. दरम्यान सोने आणि चांदीने सुद्धा जबरदस्त धावा चोपण्यास सुरुवात केली आहे.
फक्त ३ दिवसांतच सोने हजारांनी वाढले आहे . तर २ हजारांनी चांदीने सुद्धा मुसंडी मारली. दिवाळीच्या दिवसात सोने ८० हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सणासुदीच्या दिवसांत काळात ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवाती म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात २२० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर मात्र सोन्याने दर वाढण्यास सुरुवात झाली. १६ ऑक्टोबर ४९० तर १७ सप्टेंबर रोजी २२० रुपयांनी तर १८ ऑक्टोबरला ८७० रुपयांची मुसंडी सोन्याने मारली आहे.
गुडरिटर्न्स अनुसार, आता २२ कॅरेट सोने ७२,५०० रुपये प्रति १० ग्रॅम तर , २४ कॅरेट सोन्याचा भाव ७९,१३० रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिवाळीनंतर देखील काही दिवस सोने वधारणार असल्याची शक्यता आहे.
आजचा १४ ते २४ कॅरेटचा भाव काय ?
Silver Rate Today 20 October 2024
आज सकाळच्या सत्रा मध्ये इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन कडून मिळालेल्या माहितनुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७७,४१० तर २३ कॅरेट ७७,१०० तर २२ कॅरेट सोने ७०,९०८ रुपयांवर घसरले आहे.
१८ कॅरेट आता ५८,०५८ रुपये, १४ कॅरेट सोने ४५,२८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. तसेंच एक किलो चांदीचा भाव ९२,२८३ रुपये इतका झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावा मध्ये बऱ्याचदा तफावत दिसून येते.(Silver Rate Today 20 October 2024)
घरबसल्या जाणून घेता येतात भाव ;
सोने चांदीच्या किंमती ग्राहक घरबसल्या सुद्धा जाणून घेऊ शकतात. त्याकरिता ते 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा: – whatsapp.
हेही वाचा: – सोने गुंतवणूकदार आणि खरेदीरांसाठी आनंदाची बातमी!
Mahindra Diwali Offer 2024 : महिंद्रा देतंय ग्राहकांसाठी खास ऑफर , वाहन खरेदीवर लाखोंची सुट !