Solar Panels For Home :1,500 ते 1,200 रुपये खर्चात बसवा सोलर पॅनल कॉम्बो !

Solar Panels For Home  : केंद्र शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन मिळावे याकरिता वेगवेळी पावले उचलली जाताना दिसत आहेत. या बाबतच्या विविध योजना देखील राबवल्या जात आहेत.

वाढत्या महागाईच्या काळात वीज बिलं देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे बरेच लोक या वाढत्या विजबिलामुळे त्रासले आहेत. अशा लोकांकरिता सौर ऊर्जा हा एक प्रकारे चांगला पर्याय ठरू शकतो.

Solar Panels For Home 
Solar Panels For Home

आपल्या घरावर सोलर पॅनल बसवल्याने , दरमहिन्याला येणाऱ्या विजबिळापासून कायमची सुटका मिळू शकते . या माध्यमातून घराला आवश्यक असलेल्या विजेचा वापर आपल्याला करता येतो. यासोबतच खास बाब म्हणजे पर्यावरण स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा सौर ऊर्जेचा वापर हा चांगला पर्याय आहे.

सौर ऊर्जे करिता राज्यात ‘पीएम सूर्यघर’ यांसारख्या अनेक योजना आहेत, ज्यामाध्यमातून आपल्याला चांगले अनुदान देण्यात येते.

तर मंडळी आजच्या लेखात आपण अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशा ‘सोलर कॉम्बो पॅकेज’ बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . जो तुम्ही १,२३० रुपयांच्या मासिक पेमेंटमध्ये देखील बसवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात हे कॉम्बो पॅकेज नेमके आहे तरी कसे ? आणि त्याबद्दलची अधिक माहिती.

बाजारात कमीत कमी किमती पासून, जास्तीत जास्त किमतीपर्यंतचे सोलर पॅनल उपकरणे उपलब्ध आहेत.
तर काही ब्रँड्सकडून ‘सोलर कॉम्बो पॅक’ मध्ये विकले जातेय. सोलर कॉम्बो पॅक मध्ये आपल्याला कमी किमतीत संपूर्ण सोलर सिस्टम उपलब्ध होते.

खालील प्रमाणे २ प्रकारच्या सोलर पॅनल कॉम्बो पॅकेज बद्दल माहिती दिली आहे .

लुमिनस सौर कॉम्बो पॅकेज : लुमिनस ही भारता मधील आघाडीची सौर व विद्युत उपकरणे बनवणारी कंपनी आहे. लुमिनस कंपनीच्या माध्यमातून देखील सोलर कॉम्बो पॅकेजची विक्री केली जात आहे. तसेंच या पॅकेजमध्ये दोन १६५ वॅट असलेले सोलर पॅनल तसेच NXG १,४०० सोलर इन्वर्टर आणि LPTT 1215H सोलर बॅटरी मिळते. आणि या पॅकेजची किंमत ३५,००० रुपये आहे . यावर तुम्हाला कर्ज सुविधा देखील देण्यात येते, शिवाय महिन्याला ईएमआय स्वरूपात १,५५० रुपये, अशी देखील सुविधा आहे.(Solar Panels For Home  )

त्यानंतर आहे ‘जिनस सोलर कॉम्बो पॅकेज’.

तर मंडळी जीनस सोलर सोल्युशन ही देखील भारतामधिल एक लोकप्रिय कंपनी आहे. जी उत्कृष्ठ दर्जाचे ‘सोलर कॉम्बो पॅकेज’ बनविते. आणि या पॅकेजेच्या मदतीने आपल्या घरावर सोलर सिस्टम अगदी सहजपणे इन्स्टॉल करता येते.

या पॅकेज अंतर्गत 165 वॅट सौरपॅनल व सुरज एल सोलर यूपीएस( इन्वर्टर ) आणि 150Ah लांब टीब्युलर बॅटरी देण्यात येते.(Solar Panels For Home  )

आणि याच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास, २५,००० हजार रुपयात हा कॉम्बो पॅकेज दिला जातो, या मध्ये देखील कर्ज सुविधा उपलब्ध असून, शिवाय मासिक ईएमआय १,२३१ रुपये आहे . जो की सर्वसामान्यांना परवडेल असाच आहे.(Solar Panels For Home  )

वॉरंटी बद्दल सांगायचे झाले तर, या पॅकेज अंतर्गत इन्व्हर्टरवर दोन वर्षांची वॉरंटी दिली जाते.

सोलर कॉम्बो पॅकेजचे’ होणारे फायदे :

हे सोलर पॅनल घेताना सुरुवातीला जास्त गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. शिवाय मासिक ईएमआय पर्याय असल्यामुळे अगदी सुलभ हप्त्यांमध्ये पैशांची परतफेड करता येते. .

सोलर सिस्टम मुळे घरातील वीज बिल मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येते. सोलर सिस्टमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते इन्स्टॉल केल्यानंतर ग्रीड वरील तुमचे अवलंबित्व कमी होते.

सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि हरित ऊर्जा असल्याकारणाने पर्यावरणाची होणारी हानी टाळता येते.

अशाप्रकारे सोलर कॉम्बो पॅकेज हे घरातील विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा एक परवडणारा आणि प्रभावी मार्ग आहे. जीनस आणि लुमिनस सारख्या कंपन्यांचे हे पॅकेज मासिक ईएमआय वर उपलब्ध आहेत , त्यामुळे तुम्ही सौर पॅनेल बसविण्याच्या विचारात असाल तर, या पर्यायांचा नक्कीच विचार करावा.(Solar Panels For Home  )

अशाच नवनवीन आणि महत्त्वपूूर्ण अपडेड नियमित वाचण्यासाठी प्रभातमराठीच्या व्हाटसअप ग्रुपचे सदस्य व्हा.….whatsapp.com

हेही वाचा:

Magel Tyala solar Pump Yojana Online Registration : मागेल त्याला सोलर पंप योजना, असा करा ऑनलाईन अर्ज

Maha Dbt Cotton Picking Bags : 100% अनुदानावर मिळणार कापूस वेचणी बॅग ! असा करा अर्ज

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment