Soyabean Kapus Anudan List : 2023 सोयाबीन कापूस अनुदान लाभार्थी यादी जाहीर, असे तपासा आपले नाव

Soyabean Kapus Anudan List कापूस सोयाबीन अनुदानाच्या निधीच्या प्रतीक्षा संपली , असे तपासा आपले नाव यादीत…

तर मंडळी शासनाकडून देण्यात येणाऱ्या सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य म्हणजेच अनुदाना अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या अनुदानाचा निधी लवकरच जमा करण्यात येणार आहे. आणि त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही देखील योजनेसाठी अर्ज केला होता , तर यादी मध्ये आपले नाव आले की नाही ते पहावे लागणार आहे. आणि ते कसे पाहता येणार ? याबद्दल आपण आजच्या लेखात सविस्तर माहिती घेणार आहोत.

Soyabean Kapus Anudan List
Soyabean Kapus Anudan List
लाभार्थी यादी मध्ये असे तपासा आपले नाव

लाभार्थी यादी आपल्या मोबाईल फोन वरून देखील पाहता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात मोबाईल वरून ही लाभार्थी यादी कशी चेक करायची.

सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम वर येऊन uatscagridbt.mahaitgov.in असे सर्च करून, या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर वेबसाईटचे होम पेज उघडेल. जिथे तुम्हाला ‘सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य’ असे वाचायला मिळेल. (Soyabean Kapus Anudan List )

त्याच्यावरच कोपऱ्यात तुम्हाला 3 पर्याय दिसतील , ज्यामधिल तुम्हाला 3 नंबर चा निळ्या रकाण्यातील ‘फार्मर सर्च’ असा पर्याय दिसेल. तुम्हाला यावर क्लीक करायचे आहे. यादीत नाव पाहण्यासाठी.

Soyabean Kapus Anudan List

‘फार्मर सर्च’ वर क्लीक केल्यानंतर तुमच्या समोर आणखी एक नवे पेज उघडेल ज्या मध्ये तुम्हाला ‘फार्मर लॉगिन’ असा पर्याय दिसेल या मध्ये तुम्हाला आपला आधार नंबर टाकून लॉगिन करायचे आहे. आणि गेट ओटीपी पर्यायावर क्लीक करायचे आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे. त्यावर हा otp येणार आहे. खालील रकाण्यात आलेला Otp प्रविष्ठ करून ‘व्हेरिफाय ओटीपी फॉर आधार’ पर्यायावर क्लीक करायचे आहे. आणि Ok करून पुढील पेज वर जायचे आहे.(Soyabean Kapus Anudan List )

आता तुमच्या समोर फार्मर लिस्ट (Farmer List) म्हणून नवीन पेज दिसेल. इथून तुम्हाला लाभार्थी यादी सहजरीत्या तपसता येणार आहे. त्याकरिता तुमच्या समोर डिव्हिजन ,डिस्ट्रिक्ट,तालुका, व्हिलेज असे पर्याय दिसतील , जे तुम्हाला आपल्या योग्य रित्या निवडायचे आहेत. जे काही तुमच्या गावाचे , तालुक्याचे नाव असेल ते याठिकाणी तुम्हाला निवडता येणार आहे. सर्व माहिती भरल्यानंतर त्या खालील ‘सर्च’ बटनावर क्लीक करा. 

Soyabean Kapus Anudan List

सर्च (Search ) केल्यानंतर तुमच्या समोर एक यादी उघडली जाईल. जी की गावानुसार लाभार्थी यादी असेल. यामध्ये तुम्हाला सिरीयल नंबर तसेंच खाते दारकांची नावे दर्शवली जातील. यासोबतच तुमचे खाते नंबर आणि क्रॉप नेम देखील दिसतील. कापूस सोयाबीन तुम्ही किती क्षेत्रात घेतले होते हे देखील याठिकाणी तुम्हाला दिसेल.

तर अशा प्रकारे तुम्हाला लाभार्थी यादी मध्ये आपले नाव तपासता येणार आहे. आता ज्या शेतकरी बांधवांचे यादी मध्ये नाव नसल्यास , ते काही दिवसांनी समाविष्ट होऊ शकते. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.

ही माहिती आवडल्यास पुुढे आपल्या शेतकरी मित्रां पर्यंत नक्की पोहचवा. आशा करतो की हा लेख नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल.

असेच नवनवीन माहितीपुर्ण लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.

हेही वाचा:-Saur krushi vahini Yojana 2.0: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

Ahilyadevi Mahamesh Yojana Online Application 2024 :अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment