Variety Of Garlic : लसणाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा लाखोचे उत्पन्न
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसूण लागवड करण्यात येते. लसूण लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळण्यास मदत होते. दैनंदिन वापरातील प्रमुख घटक असल्याने लसणाची मागणी देखील जास्ते असते. साधारणपणे प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकात लसणाचा वापर केला जातो. म्हणूनच वर्षभर लसणाला चांगली मागणी असते तसेंच त्याचे दर टिकून असल्याचे सुद्धा पाहायला मिळते. आपण पाहतोय की मागील काही महिन्यांपासून लसणाच्या दरात मोठ्या प्रमाणात तेजी आली असून सध्या लसणाचे दर देखील ३०० ते ३५० रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत.
तर तुम्ही देखील शेतकरी असाल ? आणि लसूण लागवडीतून चांगला नफा मिळवण्यासाठी योग्य वाण वापरण्याच्या विचारात असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर कुठल्याही पिकाप्रमाणे जर भरघोस उत्पादन हवे असेल तर लागवडीकरिता वाणाची निवड करताना ती सुधारित आणि दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वाणाची कारणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब लसणाच्या बाबतीत सुद्धा लागू होते.
Variety Of Garlic
याचप्रमाणे जर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे विकसित करण्यात आलेल्या सुधारित जाती पाहिल्या तर त्या देखिल लागवडीकरिता अतिशय उपयुक्त ठरतात.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर, भारतामधील लसूण लागवड करणाऱ्या भागातून स्थानिक वाणाचा संग्रह तयार करून त्यातून निवड पद्धतीने जास्त उत्पादन आणि उत्पन्न देणाऱ्या काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. तर या जाती कोणत्या आणि त्यांचे वैशिष्ट्ये काय याच बद्दलची माहिती आपण आजच्या या लेखातुन घेऊयात.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या लसणाच्या काही जाती पुढीलप्रमाणे.
फुले बसवंत
फुले बसवंत ही लसणाची सुधारित जात आहे. तसेंच ही जात निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली असून व या वाणाच्या गड्ड्याचा रंग हा जांभळा असतो. याच्या पाकळ्या देखील जांभळ्या रंगाच्या असतात. लसणाच्या एका गड्ड्यात २५ ते ३० पाकळ्या येतात. यासोबतच साधारणता हेक्टरी उत्पन्न १४० उत्पन्न मिळते. फुले बसवंत या वाणाची लागवड रब्बी हंगामामध्ये करता येते आणि विशेषतः या करताच हा वाण शिफारस करण्यात आलेला आहे.
गोदावरी
गोदावरी वाण असलेल्या लसणाचा गड्डा रंगाने जांभळा पांढरा असतो. तसेंच आकाराने सुद्धा मध्यम असतो. या वाणाच्या एका गड्ड्यामध्ये साधारणपणे २४ पाकळ्या असतात. गोदावरी वाणाची लागवड केल्यानंतर साधारणपणे १४० ते १४५ दिवसातच तो काढणीस तयार होतो. आणि उत्पादना बद्दल बोलायचे झाले तर, १०० ते १०५ क्विंटल उत्पादन सहज मिळते.(Variety Of Garlic)
श्वेता
श्वेता ही लसणाची जात लसूण लागवडीकरिता फार उपयुक्त आहे. तसेच या जातीच्या लसणाचा गड्डा रंगाने अतिशय पांढराशुभ्र असतो. त्याचा स्वाद तिखट तर असतोच शिवाय तो आकारने सुद्धा मोठा गड्डा असतो. साधारणपणे एका गड्ड्यात २६ पाकळ्या असतात. या श्वेता जातीची लागवड केल्याच्यानंतर साधारणता १३० ते १३५ दिवसात तो काढणीस तयार होतो. तसेंच यामधून हेक्टरी १०० ते १०५ दरम्यान उत्पादन प्राप्त होते.(Variety Of Garlic )
फुले नीलिमा
फुले नीलिमा हा सुधारित वाण लसूण लागवडीकरिता अतिशय उपयुक्त ठरतो. या जातीचा लासनाचा गड्डा आकाराने बऱ्यापैकी मोठा व जांभळ्या रंगाचा असतो. लसणावर येणाऱ्या फुल किडे तसेच कोळी या कीटकांना तर जांभळ्या करपा रोगाला मध्यम प्रतिकारक्षम असल्याने फवारणी किंवा रोग नियंत्रणावर येणारा खर्च देखील कमी प्रमाणात होतो.(Variety Of Garlic )
यमुना सफेद-2
यमुना सफेद दोन हा देखील लसणाचा प्रसिद्ध वाण असून, शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणारा हा वाण आहे. या वाणाचे गड्डे घट्ट, आकर्षक आणि पांढऱ्या रंगाचे असतात व लसणाच्या एका गड्ड्यांमध्ये साधारणता ३५ ते ४० लसणाच्या पाकळ्या असतात. यमुना सफेद २ या जातीच्या लागवडीपासून सरासरी हेक्टरी १५०, २०० क्विंटल उत्पादन मिळून जाते.(Variety Of Garlic)
असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा : व्हॉट्सअप ग्रुप
हेही वाचा :- 23 क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या सुधारित जातीपैकी एक ही आहे
Garlic And Corn Crop Variety : मका आणि लसणासाठी वापरा हे वाण आणि मिळवा भरगोस उत्पादन..